'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


दिलखुलासकार्यक्रमात याच मुलाखतीचे बुधवारी आणि गुरुवारी प्रसारण


मुंबई, दि.२३: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' आणि दिलखुलासकार्यक्रमात अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी  दिलीप शिंदे यांची 'विधानसभा निवडणूक कार्यक्रम - २०१९' या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही विशेष मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर मंगळवार दिनांक २४ सप्टेंबर  २०१९ रोजी  संध्याकाळी ७.३० वाजता प्रसारित होईल. तसेच  राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. २५ आणि गुरुवार दि. २६  सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
    
विधानसभा निवडणुक कार्यक्रम-2019, या अनुषंगाने विभागाने केलेली तयारी,  मतदानामधील युवक व महिलांचा सहभाग वाढावा म्हणून राबविण्यात येणारा स्वीप (SVEEP) कार्यक्रम, ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबद्दल लोकांच्या मनात असलेला संभ्रम दूर करण्यासाठी विभागाकडून सुरु असलेले प्रयत्न, प्रचारादरम्यान राजकीय पक्षांकडून होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष ठेवण्यासाठी होत असलेले प्रयत्न, दिव्यांग व महिला मतदारांकरिता असलेल्या विशेष सोयी, निवडणुकीच्या कार्यान्वयनामध्ये गती व सुसूत्रता येण्यासाठी निवडणूक आयोगाने विकसित केलेले नवीन ॲप, आदी विषयांची माहिती श्री. शिंदे  यांनी  'जय महाराष्ट्र' आणि दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.
०००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.