'दिलखुलास' कार्यक्रमात उद्या महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक बाळसिंग राजपूत यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात महाराष्ट्र सायबरचे पोलीस अधीक्षक तथा विधानसभा निवडणुका-२०१९ सोशल मीडिया मॉनिटरिंगचे राज्य समन्वयक बाळसिंग राजपूत यांची ' सोशल मीडिया व निवडणुका ' या विषयावर  विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून शुक्रवार दि.२७ सप्टेंबर आणि सोमवार दि. ३० रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होईल. निवेदक हेमंत बर्वे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
      
निवडणूक प्रक्रियेत केला जाणारा सोशल मीडियाचा वापर, धार्मिक, जातीय तेढ किंवा द्वेष निर्माण करणाऱ्या पोस्टला प्रतिबंध करण्यासाठी निवडणूक आयोगाने घेतलेली दक्षता, फेक जाहिराती, क्रियाशील सायबर संस्कृती म्हणजे काय, सोशल मीडियासंदर्भातील तक्रारीसंदर्भात कुठे संपर्क साधावा, या विषयांची माहिती श्री. राजपूत  यांनी 'दिलखुलास' या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा

Blogger द्वारा समर्थित.