पाच कोटीपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेला मान्यता देण्याचा अधिकार प्रादेशिक समितीस - मंत्री बबनराव लोणीकर यांची माहिती

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : राज्यात राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजनांना प्रादेशिक व शासन स्तरावरील समितीकडून मान्यता देण्यात येते. परंतु आता पाच कोटी रुपयांपर्यंतच्या पाणीपुरवठा योजनेला प्रादेशिक स्तरावरील समितीस मान्यता देण्याची परवानगी दिली असल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी दिली.

श्री.लोणीकर म्हणाले, प्रादेशिक समितीस ज्या गावांसाठी पूर्वीची कोणतीही पाणीपुरवठा योजना नाही, ज्या योजना विहित दरडोई खर्चात बसत असतील, ज्या योजनांचे आयुर्मान संपलेले आहे, ज्या गावांचा समावेश कोणत्याही प्रादेशिक योजनेत नाही,अशा योजनेला मान्यता देता येणार आहे. तसेच याव्यतिरिक्त सर्व पाच कोटी वरील योजनांना मान्यता देण्याची परवानगी पाणीपुरवठा  विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या राज्यस्तरीय समितीला असेल.
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा