भारतीय स्वातंत्र्याच्या ७२ व्या वर्धापन दिनानिमित्त विधान भवन येथे ध्वजारोहण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 15 : विधान भवन येथे आज स्वातंत्र्याच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त विधानपरिषदेचे सभापती,रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते,विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.
    
याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव यू.के.चव्हाण, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांचे सचिव महेंद्र काज, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव राजकुमार सागर, विधानमंडळ सचिवालयाचे  उप सचिव विलास आठवले, जितेंद्र भोळे, मेघना तळेकर, शिवदर्शन साठ्ये, राजेश तारवी, नागनाथ थिटे, अवर सचिव सायली कांबळे, सोमनाथ सानप, रवींद्र जगदाळे, रंगनाथ खैरे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विधानमंडळाचे मुख्य सुरक्षा अधिकारी महेश चिमटे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यावेळी मानवंदना दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा