मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि.10:  राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या आपत्कालीन परिस्थितीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी दिली आहे.

3 ऑगस्टपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक ठिकाणी विशेषत: सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. या ठिकाणच्या बाधित लोकांचे स्थलांतर अन्य ठिकाणी करण्यात आले आहे. पूरग्रस्तांसाठी इच्छुक देणगीदार / मदत करू इच्छिणाऱ्या व्यक्ती / संस्था / संघटना यांचेकडून खाद्यपदार्थ, कपडे तसेच तत्सम साहित्य, प्रथमोपचार साहित्य, औषधे व इतर आवश्यक साहित्य स्वीकारण्याकरिता मुंबई उपनगर जिल्ह्यात खालील ठिकाणी नैसर्गिक आपत्ती मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहेत.

1     जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई उपनगर प्रशासकीय इमारत, 10 वा मजला, शासकीय वसाहत, बांद्रा
(पूर्व), मुंबई-400051 दूरध्वनी - 022-26556799
2     उपविभागीय अधिकारी, मुंबई पूर्व उपनगर    निळकंठ बिझनेस पार्क, ए विंग, तळ मजला, किरोळ रोड, विद्याविहार (प.), मुंबई-400086       दूरध्वनी 022-25111126
3     तहसिलदार, अंधेरी डी.एन.रोड, भवन्स कॉलेज जवळ, अधेरी (प.), मुंबई-400058     दूरध्वनी 022-26231368
4    तहसिलदार, बोरीवली    डॉ.न.रा.करोडे मार्ग, नाटकवाला लेन, एस.व्ही.रोड, बोरीवली (प.), मुंबई-400092 दूरध्वनी 022-28075034
5    तहसिलदार, कुर्ला   टोपीवाला कॉलेज इमारत, 1 ला मजला, सरोजिनी नायडू रोड, मुलुंड (प.), मुंबई-400080       दूरध्वनी  022-25602386

पूरग्रस्त लोकांना आवश्यक असणाऱ्या साहित्याची यादी वरील मदत कक्षात उपलब्ध आहेत. तरी पूरग्रस्तांसाठी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत करावी असे आवाहन जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर यांनी केले आहे.
00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा