अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या नेतृत्वात पूरग्रस्त भागात डॉक्टरांचे पथक रवाना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


अकोला,दि.11 : पूरग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी सांगली येथे गृह(शहरे) राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.रणजित पाटील यांच्या नेतृत्वात पूरगस्त भागात अकोला येथील आठ डॉक्टरांच पथक रविवारी (दि.11) रवाना झाले.

अतिवृष्टीमुळे सांगलीसह सातारा व  कोल्हापू जिल्ह्यात प्रचंड पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे साथीचे रोग, त्वचारोग होण्याची शक्यता आहे. तातडीची मदत म्हणून आठ डॉक्टरासह, दोन फार्मासिस्ट, काही सामाजिक  कार्यकर्ते यांच्यासह पॅरामेडिकल्स स्टॉफ, दोन ॲम्बुलन्स, ऑक्सीजन सिलेंडरसह दहा हजार पूरग्रस्तांना पुरेल एवढा औषधसाठा घेवून पहिल्या टप्प्यात पथक सांगलीला रवाना झाले आहे. हे पथक तीन-चार दिवस व आवश्यकता वाटल्यास जास्त दिवस सेवा देणार आहे. एक दोन दिवसानंतर दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात कपडे व इतर जीवनाश्यक वस्तू घेवून जाण्यासाठी नियोजन करण्यात आले आहे.

ज्या सामाजिक संस्था, दानशूर व्यक्ती व समाजातील  इतर व्यक्ती यांना  मदत करावयाची असेल त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन शाखेत मदतद्यावी. रोख रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये कोणत्याही बँकेत जमा करावी, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा