पूर परिस्थितीमुळे स्वातंत्र्यदिनानिमित्तचा स्नेहभोजन, चहापान कार्यक्रम रद्द

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 13 : राज्याच्या काही जिल्ह्यात पूर परिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच अन्य मान्यवरांना स्नेहभोजन आणि स्वातंत्र्य दिनी सायंकाळी आयोजित करण्यात येणारा चहापान कार्यक्रम यावर्षी रद्द केला आहे.

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला विदेशी महावाणिज्यदूत तसेच इतर मान्यवरांना स्नेहभोजन तसेच स्वातंत्र्य दिनी सायंकाळी मुंबई शहरातील मान्यवरांसोबत स्नेहोपाहार (चहापान) या दोन कार्यक्रमांचे आयोजन मुख्यमंत्र्यांकडून दरवर्षी केले जाते. मात्र सध्या राज्याच्या काही जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती व त्यातून काही निष्पाप व्यक्तींचा झालेला मृत्यू या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी दि. 14 ऑगस्ट 2019 रोजी आयोजित स्नेहभोजन आणि दिनांक 15 ऑगस्ट रोजी सायंकाळी  मंत्रालय प्रांगणात आयोजित स्नेहोपाहार कार्यक्रम हे दोन्ही कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सर्व निमंत्रितांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या असून नैसर्गिक आपत्तीमुळे उद्भवलेल्या संकटाचा सामना करण्यासाठी सर्वांच्या बहुमोल पाठिंब्याची व सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
००००
सचिन गाढवे/ वि.सं.अ./ दि. 13.8.2019

0000

Dinner, At-home on Independence Day cancelled

Mumbai, Aug 13: In view of the severe and unprecedented flood situation in some districts of the state and the loss of live in this natural calamity, Chief Minister Devendra Fadanvis has cancelled the courtesy dinner for Foreign Consulate Generals on the eve of Independence Day and the At-home program organised on the evening of Independence Day.
Every year, the dinner is organised for the foreign consulate generals and some other dignitaries on the eve of Independence Day and on the evening of Independence Day prominent citizens of Mumbai are invited for At-home party. However, in view of the unprecedented flood situation in some districts of the state and loss of lives in this natural calamity, both these programs to be held on evening of August 14 and the At-home program to be held at Mantralaya premises on August 15 are cancelled.
Chief Minister Fadanvis has extended greetings to all the invitees on the occasion of Indian Independence Day and appealed them to support and cooperate with the government efforts to tide over the difficult situation arisen due to severe floods in the state.

०००००कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा