‘दिलखुलास' कार्यक्रमात उद्यापासून ‘स्पर्धा परीक्षेची तयारी’ या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. १५ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात स्पर्धा परीक्षेची तयारीया विषयावर स्पर्धा परीक्षा तज्ज्ञ प्रा. मीनल मापुस्कर यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून मंगळवार दि. १६, बुधवार दि. १७, आणि गुरुवार दि. १८ आणि शुक्रवार दि. १९ जुलै रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेला कधी सुरुवात करावी, या परीक्षांचा बदललेला अभ्यासक्रम, सराव चाचण्यांचे महत्त्व आदी विषयांची माहिती श्रीमती मापुस्कर यांनी दिलखुलासया कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा