स्वच्छतेच्या क्षेत्रात राज्याचे काम उल्लेखनीय - पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतविभागाच्या अधिकाऱ्यांचे मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडून कौतुक

मुंबई, दि. 9 : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयच्या वतीने देशभर घेण्यात आलेल्या स्वच्छ सुंदर शौचालय स्पर्धेत (ग्रामीण) कोल्हापूर जिल्ह्याने देशातून दुसरा क्रमांक पटकावला असून राज्याच्या श्रेणीत महाराष्ट्र तिसऱ्या स्थानावर  राहिला  आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेची प्रभावी अंमलबाजावणी करण्यात आली होती. स्वच्छतेच्या बाबतीत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर काम केले आहे. प्रत्येकाच्या घरात ही सुविधा पोहोचली असल्याने नागरिकांचे मतपरिवर्तन झाले असल्याचे निदर्शनास येत आहे. स्वच्छतेच्या  क्षेत्रात राज्याचे काम उल्लेखनीय असल्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी सांगितले.


मंत्रालयात स्वच्छता पुरस्कार मिळाल्याबाबत विभागाच्या अधिकाऱ्यांचे कौतुक करण्यात आले. त्यावेळी श्री.लोणीकर बोलत होते. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, उपसचिव अभय महाजन, पाणी व स्वच्छता सहाय्य संस्थेचे संचालक राहूल साकोरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.


श्री. लोणीकर म्हणाले, केंद्रीय पेयजल व स्वच्छता विभागाने 1 ते 31 जानेवारी 2019 दरम्यान देशभरातील राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये स्वच्छ  सुंदर शौचालय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छ सुंदर शौचालय मोहिमेची प्रभावी अंमलबाजावणी करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत राज्यात 26 लाख 48 हजार 26 शौचालये रंगविण्यात आले होते. कोल्हापूर जिल्ह्याने साडेचार लाख शौचालय स्वच्छ सुंदर करून दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळवला आहे. तसेच या स्पर्धेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या देशातील सात जिल्हांमध्ये सातारा जिल्ह्याने विशेष पुरस्कारात महाराष्ट्राची मान देशात उंचविल्याने सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे काम कौतुकास्पद आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा