प्रो. जे. व्ही. नाईक यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राचे नुकसान : राज्यपालांची श्रद्धांजली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई,‍ दि. 22 : प्रसिद्ध इतिहासकार व मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रो. जे. व्ही. नाईक यांच्या निधनाबद्दल राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी दुःख व्यक्त केले आहे.

प्रो. जे. व्ही. नाईक एक ज्येष्ठ इतिहासकार, संशोधक, लेखक तसेच विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. भारतीय इतिहास परिषदेचे अध्यक्ष होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वातंत्र्यपूर्व काळातील अनेक महत्त्वपूर्ण घटनांवर तसेच व्यक्तींवर त्यांनी केलेले संशोधन व लिखाण बहुमोल स्वरूपाचे आहे. आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले तसेच संशोधकांना मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनामुळे इतिहास संशोधन क्षेत्राची मोठी हानी झाली आहे, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.  

००००

Maharashtra Governor condoles demise of Prof J V Naik
Mumbai, 22nd July : The Governor of Maharashtra Ch. Vidyasagar Rao has expressed grief over the demise of renowned historian and former Head of the Department of History of the University of Mumbai Prof J V Naik in Mumbai on Monday (22 July). In a condolence message, the Governor wrote:
“Prof J V Naik was an acclaimed historian, researcher, writer and a popular teacher. He had the honour of being selected as the General President of the Indian History Congress. Prof Naik made invaluable research on important individuals and events shaping the history of India. He guided several research scholars during his long and illustrious career. His demise is a great loss to the field of historical research.”

0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा