विधानपरिषद लक्षवेधी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

आयटीआयमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची एसीबीमार्फत चौकशी
- कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर

मुंबई , दि 2 : राज्य शासनाच्या व्यवसाय प्रशिक्षण संचालनालयामध्ये 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या भ्रष्टाचार प्रकरणी समिती गठित करण्यात आली होती. आता या प्रकरणातील चौकशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) सोपविण्यात येत आहे. येत्या 15 ऑगस्टपर्यंत अहवाल प्राप्त करून यात जे दोषी आढळतील, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी लक्षवेधी सूचनेचा उत्तरात दिली.


आवश्यकता नसतानाही बऱ्याच आयटीआयमध्ये 50 कोटींचे टूल्स खरेदी तसेच अन्य बाबीतही भ्रष्टाचार झाला असल्याबाबत सदस्य ना.गो.गाणार, प्रा.अनिल सोले यांनी प्रश्न विचारला, त्यास श्री. पाटील यांनी उत्तर दिले. 

संजय ओरके/2.7.19

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा