‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या व ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात परवा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 3 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' 'दिलखुलास' कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची  ' 'वंचितांच्या विकासासाठी' या विषयावरील मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून 5 जुलै रोजी संध्याकाळी 7.30 ते 8 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून  गुरुवार  दि.4 आणि शुक्रवार दि. 5 जुलै 2019 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी  ही  मुलाखत घेतली आहे.

वंचितांच्या विकासासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी, दिव्यांग, निराधार, वंचित, विधवा या सर्व घटकांना अर्थसंकल्पात स्थान देण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न, लमुक्त आणि धूरमुक्त महाराष्ट्रसाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेली भरीव तरतूद, आरोग्य, शिक्षण, क्षेत्रासाठी अर्थसंकल्पातील तरतुदी, विकासापासून वंचित असलेल्या लोकांसाठी अर्थसंकल्पातून मांडण्यात आलेली उद्दिष्टे आदी विषयांची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा