पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावे विद्यापीठाने अध्यासन सुरु केल्यास आवश्यक निधी उपलब्ध करुन देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीची पायाभरणीसोलापूर, दि. 11 : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करण्याच्या मागणीला राज्य शासन निश्चित परवानगी देईल आणि त्यासाठीचा निधीही उपलब्ध करुन देण्यात येईल. त्याचबरोबर विद्यापीठाच्या विस्तारीकरणासाठी आवश्यक आराखड्याला टप्प्याटप्याने आवश्यक निधीही दिला जाईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मात्र, प्रत्येक विद्यापीठाने विस्तारीकरणाबरोबरच गुणवत्ता विकासाकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या नूतन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. सहकार, मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
 

यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, विद्यापीठाच्या भव्य व सुसज्ज इमारतीचे भूमिपूजन करताना आपल्याला आनंद होत आहे. कारण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित असले तरी या विद्यापीठाने विद्यार्थ्यांना आवश्यक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. या विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव दिले आहे. त्यांचे कार्य देशभरात आणि विविध क्षेत्रात होते. कुशल प्रशासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यामुळे विद्यापीठाने अध्यासन सुरु करावे, त्यास आवश्यक तो निधी निश्चितपणे देऊ.
   

विद्यापीठाने विस्तारीकरणासाठी आखलेल्या आराखड्यास टप्प्याटप्प्याने निश्चितपणे अर्थसंकल्पातून निधी दिला जाईल, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सध्या सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढत आहेत. हे क्षेत्र विस्तारत असताना त्यांना लागणारे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाने तयार केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेची कल्पना मांडली आहे. येत्या पाच वर्षात त्या दिशेने काम होऊन अधिकाधिक गुंतवणूक देशात होईल, असा विश्वास आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागात पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम आता सुरु आहे. विद्यापीठांनी हा बदल ओळखून त्यासाठीचे आवश्यक अभ्यासक्रम समाविष्ट केले पाहिजेत.


मूलभूत संशोधन क्षेत्रात अधिक काम करण्याची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, आपल्या देशातील ज्ञान कधी सुविधांमध्ये अडकले नाही. नालंदा व तक्षशिलासारखी विद्यापीठे त्याकाळी आपल्या देशात होती. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र अशा विषयांचा अभ्यास त्याकाळी केला गेल्याचे दिसते. विद्यापीठांनी आता डॉक्टरेट मिळवणाऱ्या संशोधन प्रकल्पांचा खरोखरच किती फायदा विद्यार्थ्यांना होतो, हे तपासले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. त्यामुळेच आता विद्यापीठाची जबाबदारी वाढली असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.
    

कुलगुरु  डॉ. फडणवीस यांनी प्रास्ताविकात, विद्यापीठामार्फत सुरु असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. विद्यापीठाने 14 वर्षे पूर्ण करुन 15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. विद्यापीठ स्थापन झाल्यानंतर विद्यापीठात येणारे श्री. फडणवीस हे पहिले मुख्यमंत्री असल्याचा आवर्जून उल्लेख त्यांनी केला.
   

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला तसेच दीपप्रज्वलन केले. तत्पूर्वी  विद्यापीठाच्या विस्तीर्ण ४८२ एकर परिसरात नवीन प्रशासकीय इमारत आणि परीक्षा भवन इमारतीचा पायाभरणी समारंभ श्री. फडणवीस यांच्या हस्ते झाला.   कार्यक्रमाचे आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी मानले.
०००००


CM Fadanvis assures funds to Solapur University
for starting Punyashloa Ahilyadevi Chair
Solapur, July 11: The state government will definitely concede to the demand for starting Chair in the name of Punyashloka Ahilyadevi Holkar in the University and funds for this will also be provided, assured State Chief Minister Devendra Fadanvis while emphasizing the need for universities to concentrate on quality development along with expansion activities.
Fadanvis performed the foundation stone laying ceremony of new administrative building and examination building of Punyashloka Ahilyadevi Holkar Solapur University on Thursday. He was speaking after the ceremony.
State Cooperative Minister Subhash Deshmukh, MoS for Public Health, Transport and State Excise and Guardian Minister of the District Vijaykumar Deshmukh, Mayor Shobha Bahshetti, Vice-Chancellor Dr Mrunalini Fadanvis were present on the dais.
Chief Minister Fadanvis further said that he was happy to perform this foundation laying ceremony of the grand and up-to-date administrative building of the university. Though the university is confined to just one district, it has introduced courses useful for the students. This university is named after Punyashloka Ahilyadevi Holkar. She was famous for her multifaceted work in different parts of the country. She was known as an able administrator also. The university should establish a Chair in her name for which the government will definitely provide necessary funding for the same, Fadanvis assured.
Funds will also be provided in phases from the budget for the expansion plan of the university; the Chief Minister said adding that job opportunities are increasing in service sector. The university should concentrate on training skilled manpower suitable for this growing sector. Prime Minister Narendra Modi has put forth the $5 trillion economy concept to accelerate the country’s economy. In coming five years some concrete work would be done in this direction and this will fetch maximum investments. Work is on to create basic facilities in rural areas along with urban areas. The universities should identify this change and include necessary courses in their syllabi, the Chief Minister said.
Stressing the need for research in fundamental areas, Chief Minister Fadanvis said that the knowledge in our country was never caught in the facilities. We had world class universities like Nalanda and Takshila. Surgery, Astronomy and other such subjects were deeply studied in those periods. The universities should examine how far the research projects leading to PhD help the studets, he said hinting at the increasing responsibility of the varsities in this field.
Vice-Chancellor Dr Mrunalini Fadanvis made introductory remarks giving information of various initiatives launched by her university. The university has completed 14 years and entered in the 15th year. She said that Fadanvis was the first chief minister to visit the university since its foundation.
Earlier, Chief Minister Devendra Fadanvis offered floral tributes to the portrait of Punyashloka Ahilyadevi Holkar and lit the traditional lamp. He also laid the foundation of new administrative building of the university and examination building in the sprawling 482 acre premises of the university. Registrar Dr Vikas Ghute proposed vote of thanks.

0000


पुण्यश्लोक अहिल्यादेवी के नाम से विश्वविद्यालय द्वारा अध्यासन शुरू किए जानेपर आवश्यक निधि उपलब्ध करवाएंगे  - मुख्यमंत्री फडणवीस
सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर के नाम से अध्यासन शुरू करने की मांग को राज्य सरकार की ओर से निश्चित तौर पर अनुमति दी जाएगी. साथ ही इसके लिए आवश्यक निधि भी उपलब्ध करवाया जाएगा. साथ ही विश्वविद्यालय के विस्तारीकरण के लिए आवश्यक प्रारूप के लिए भी  आवश्यक निधि दिया जाएगा, ऐसा प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने किया. लेकिन सभी विश्वविद्यालयों द्वारा विस्तारीकरण के साथ साथ गुणवत्ता विकास की ओर ध्यान देने की जरुरत है, ऐसा उन्होंने कहा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होलकर सोलापुर विश्वविद्यालय की नई प्रशासकीय इमारत और परीक्षा भवन की इमारत की नींव रखने का समारोह आज गुरुवार को मुख्यमंत्री श्री. फडणवीस के हाथों हुआ. इस समय वे बोल रहे थे. इस समय सहकार, मदद एवं पुनर्वसन मंत्री सुभाष देशमुख, सार्वजनिक आरोग्य, परिवहन एवं राज्य उत्पादन शुल्क राज्यमंत्री तथा जिले के पालकमंत्री पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टीकुलगुरु डॉ. मृणालिनी फडणवीस आदि इस समय मंच पर उपस्थित थे.
इस समय मुख्यमंत्री फडणवीस ने कहा विश्वविद्यालय के भव्य और सुसज्ज इमारत का भूमिपूजन करते समय बड़ा आनंद ह्यो रहा है.  क्योंकि एक जिले के लिए सीमित विश्वविद्यालय ने विद्यार्थियों के लिए आवश्यक सभी पाठ्यक्रम शुरू किए है. इस विश्वविद्यालय को पुण्यश्लोक अहिल्यादेवी का नाम दिया गया है. उनका कार्य देशभर में और विभिन्न क्षेत्रों में परिचित हैं. कुशल प्रशासक के रुप में उनकी पहचान थी. इसलिए उनके नाम से विश्वविद्यालय द्वारा अध्यासन शुरू किया जाए. इसके लिए आवश्यक निधि दिया जाएगा.
विश्वविद्यालय द्वारा विस्तारीकरण के लिए तैयार किए प्रारूप के लिए स्टेप बाय स्टेप बजट में से निधि दिया जाएगा ऐसा कहकर मुख्यमंत्री ने कहा, वर्तमान समय में सेवा क्षेत्र में रोजगार के अवसर बढ़ रहे हैं. यह क्षेत्र विस्तारित होते समय इसके लिए लगनेवाली श्रमशक्ति विश्वविद्यालय द्वारा तैयार किया जाना चाहिए. पंतप्रधान नरेंद्र मोदी  के अर्थव्यवस्था को गति देने के लिए  फाईव ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था की संकल्पना रखी है. आगामी पाँच सालों में उस दिशा में काम होगा, इससे अधिकाधिक निवेश देश में होगा, ऐसा विश्वास है.  शहर के साथ साथ ग्रामीण क्षेत्रों में बुनियादी सुविधाओं का निर्माण करने का काम शुरू है. विश्वविद्यालयों द्वारा यह बदलाव ध्यान में रखकर इसके लिए आवश्यक पाठ्यक्रमों का समावेश किया जाना चाहिए, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
मुलभूत संशोधन क्षेत्र में अधिक काम करने की जरूरत है, ऐसा मुख्यमंत्री ने कहा. अपने देश का ज्ञान सुविधाओं में अटक नहीं है.  नालंदा और तक्षशिला जैसे विश्वविद्यालय उस काल में हमारे देश में थी. शल्यचिकित्सा, खगोलशास्त्र ऐसे विषयों का अभ्यास उस समय में किया गया है. विश्वविद्यालयों द्वारा अब डॉक्टरेट संशोधन प्रकल्प का सही मायने में कितना लाभ विद्यार्थियों को हो रहा है, इसकी जांच होनी चाहिए, ऐसा उन्होंने कहा. इसलिए अब विश्वविद्यालयों की जिम्मेदारी बढ़ गई है, ऐसा श्री. फडणवीस ने कहा.
            कुलगुरु  डॉ. फडणवीस ने प्रस्ताविक में विश्वविद्यालय के अंतर्गत शुरू विभिन्न उपक्रमों की जानकारी दी. विश्वविद्यालय ने 14 वर्ष पूर्ण कर  15 वे साल में प्रवेश किया है. विश्वविद्यालय की स्थापना के बाद यहां आनेवाले श्री. फडणवीस  पहिले मुख्यमंत्री है, ऐसा श्रीमती फडणवीस में कहा.
            कार्यक्रम के आरंभ में मुख्यमंत्री श्री. फडणवीस में पुण्यश्लोक अहिल्यादेवी की प्रतिमा को पुष्पहार अर्पण किया. विश्वविद्यालय के विस्तीर्ण 482 एकड परिसर में नई नवीन प्रशासकीय इमारत और परीक्षा भवन इमारत की नींव रखने का समारोह श्री. फडणवीस के हाथों हुआ. कार्यक्रम का आभार कुलसचिव डॉ. विकास घुटे ने व्यक्त किए.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा