मालाड दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी; राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक सज्ज असल्याची मुख्यमंत्र्यांची विधानसभेत ग्वाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


45 वर्षातील विक्रमी पावसामुळे मुंबईच्या पाणीनिचरा व्यवस्थेवर ताण

मुंबई, दि. 2 : मालाड येथे पाणीपुरवठा व्यवस्थेजवळील संरक्षक भिंत कोसळल्याच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येईल. मृतांच्या कुटुंबियांना राज्य शासन आणि मुंबई महापालिकेतर्फे प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल. काल मुंबईत एकाच रात्री 45 वर्षातला दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस झाल्याने पाणी निचरा करणाऱ्या यंत्रणेवर ताण पडला. माहुलचे पंपिंग स्टेशनचे काम पूर्ण झाल्यावर रेल्वे रुळांवर पाणी साचणार नाही, पश्चिम रेल्वेप्रमाणेच मध्य रेल्वेवर मायक्रो टनेलिंगचे काम हाती घेण्यात येईल जेणेकरून रेल्वेसेवा थांबणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले.
सदस्य अजित पवार यांनी यासंदर्भात स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले की, मालाड येथे मृत्यमुखी पडलेल्यांप्रती सभागृहाने शोकसंवेदना व्यक्त केली आहे. संपूर्ण सभागृह मृत व्यक्तींच्या आणि जखमींच्या कुटुंबियांच्या मागे उभे आहे. काल रात्री जो पाऊस झाला तो अभूतपूर्व होता. चार ते पाच तासात 375 ते 400 मिमी पाऊस झाला. 45 वर्षातला हा दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस होता. केवळ तीन दिवसात पावसाने जून महिन्याची सरासरी ओलांडली आहे. मुंबईची पाणी निचरा क्षमता विचारात घेता, 24 तासात जेव्हा 150 मिमी पाऊस पडतो, तोवर ही क्षमता योग्य काम करते. मात्र अत्यंत कमी वेळात मोठा पाऊस होतो, तेव्हा या व्यवस्थेवर ताण येतो.


मालाडमध्ये पाणीपुरवठा व्यवस्थेजवळच्या संरक्षक भिंतीजवळ पाणी अडले आणि नंतर ती भिंत कोसळून ते पाणी खालच्या भागामध्ये शिरले. त्यातून 18 लोक मृत्युमुखी पडले. सुमारे 75 जण जखमी आहेत.  14 लोकांना उपचार करुन घरी सोडण्यात आले आहे. मी स्वत: सकाळपासून या घटनेची संपूर्ण माहिती घेतली. पहाटे साडेचार वाजता महापालिका आयुक्तांनी दूरध्वनीवरुन या घटनेची माहिती दिली. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक व सर्व व्यवस्थेमध्ये स्वत: लक्ष घातले. राज्यमंत्री योगेश सागर यांना तातडीने घटनास्थळी पाठवले. नंतर स्वत: रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. आवश्यक व्यवस्था केल्या. त्यानंतर महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षात भेट देऊन मुंबईची सर्व परिस्थिती जाणून घेतली. शहरात सर्वत्र सीसीटीव्ही लावले असल्याने त्याद्वारे अनेक भागांचे लाईव्ह चित्र पाहिले. काही भागांमध्ये पावसाचे पाणी तुंबले. ज्या भागांमध्ये पावसाचे पाणी साचण्याचा इतिहास आहे, अशा भागांमध्ये पावसाचे पाणी निचरा करण्याची व्यवस्था महापालिकेने उभी केली असल्याने पाण्याचा निचरा लवकर झाला.


ब्रिमस्टोवॅड प्रकल्पांतर्गत मुंबईत 7 पंपिंग स्टेशन उभारायचे होते. या 7 पैकी 5 पंपिंग स्टेशन पूर्ण झाले आहेत. पंपिंग स्टेशनच्या उभारणीमध्ये जागा, विविध परवानग्या, सीआरझेड, न्यायालयीन प्रकरणे अशा अनेक अडचणी येतात. त्या सोडविण्यासाठी वैयक्तिक लक्ष घातले. कांदळवनामुळे उच्च न्यायालयाची परवानगी घ्यावी लागते. माहूल आणि अन्य एक जागा या दोन्हीसंदर्भात प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित होता. ही दोन्ही स्टेशन झाल्याशिवाय ही समस्या पूर्णपणे सुटणार नाही, अशी परिस्थिती होती. विशेषत: मिठागराची जागा गरजेची होती. त्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कायदा वापरुन ती जागा सक्तीने अधिग्रहित केली. या दोन्ही जागा आता महापालिकेच्या अखत्यारीत आल्या आहेत. लवकरच तेथे पंपिंग स्टेशनचे काम सुरु करु. हे काम पूर्ण झाल्यावर मुंबईतील पाणी साचण्याची समस्या मोठ्या प्रमाणावर कमी होईल.


मुंबईतील मिठी नदी, इतर नदी-नाले यांची जागा पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे. मिठी नदीवरील मोठ्या प्रमाणावर वसलेली अतिक्रमणे हटवली आहेत. एमएमआरडीए हद्दीतील काम संपले आहे. महापालिका क्षेत्रातील कामही पूर्णत्वास आले आहे. बाधितांना पर्यायी जागा दिल्या आहेत. उर्वरित काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे.


गझदरबंध पंपिंग स्टेशन पूर्ण झाल्यामुळे यंदा मोठा दिलासा मिळाला, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
यंदा, सर्व परिस्थ‍िती पाहता, नाल्यांवरील बांधकामे काढण्याची मोठी मोहीम हाती घेतली होती. मात्र कुठेतरी कठोर भूमिका घ्यावी लागेल. पूर्ण झोपडपट्टी काढली नाही तरी नाल्यांच्या रुंदीकरणाची गरज म्हणून तरी काही निष्कासित कराव्या लागतील. स्थलांतराची पुनर्वसनाची व्यवस्था करुनही जे हटायला तयार नाहीत, त्यांच्याबाबत कठोर भूमिका घेणे भाग आहे.


नदी-नाल्यांवर अतिक्रमणे करुन जिथे पात्र/प्रवाह बदलण्यात आले आहेत, त्याबाबतही कारवाई करण्याचे निर्देश आज महापालिकेतील बैठकीत दिले आहेत,अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला दिली.


मुख्यमंत्री म्हणाले की, मागील 3 वर्षांचा डेटा आणि फुटेज उपलब्ध आहे. त्याआधारावर नेमका कुठे, कसा पाऊस होतो, कुठे त्याला अवरोध होतो, कुठे पाणी तुंबते, याचा अभ्यास करुन पुढची कार्यवाही करणार आहोत. नालेसफाईचे वेळापत्रक निश्चित करुन वेळेच्या आत नालेसफाई झाली पाहिजे. नालेसफाईचे धोरण महापालिकेने तयार करुन घोषित करावे, यासंदर्भात कार्यवाही केली जाईल. रात्रभरामध्ये मुंबई पोलिसांना 1700 ट्विट आले. प्रत्येक ठिकाणी पोलिस विभाग पोहोचला. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षालाही हजारापेक्षा जास्त कॉल आले. त्या प्रत्येक ठिकाणी महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी पोहोचले. रात्रभर महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन अधिकारी कार्यरत होते. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे. अशा घटना घडू नये म्हणून हाती घेतलेली सर्व कामे पूर्ण होईपर्यंत बारीक लक्ष ठेवावे लागेल. योग्य काळजी सर्वांना घ्यावी लागेल. त्याबाबतचेही निर्देश दिले आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.


दरम्यान, आंबेगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथेही दुर्घटना झाली आहे. सिंहगड इन्स्ट‍िट्यूटच्या भिंतीवर झाडे कोसळली. त्यामुळे झोपड्यांतील 6 कामगारांचा मृत्यू तर 4 जण जखमी झाले आहेत. ते मध्यप्रदेश व छत्तीसगढ मधील रहिवासी आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आवश्यक ती संपूर्ण मदत शासन करेल. या दुर्घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. परवा पुण्यात घडलेल्या दुर्घटनेनंतर दिलेल्या निर्देशानुसार, पुणे महापालिकेने 267 साईटची पाहणी केली असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


हवामान खात्यातर्फे मराठवाडा व विदर्भात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. यंत्रणेला संपूर्ण निर्देश दिले आहेत. वेगवेगळ्या विभागातील संभाव्य पुराच्या ठिकाणी इशारा देऊन आजूबाजूच्या लोकांना स्थलांतरित करण्याचे निर्देश दिले आहेत. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (एनडीआरएफ) सज्ज असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.


याच विषयावरील स्थगन प्रस्ताव विधान परिषदेत विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडला होता. त्यावर नियम 97 द्वारे चर्चा करण्यात आली होती. या चर्चेत सदस्य सर्वश्री शरद रणपिसे, ॲड. अनिल परब, प्रविण दरेकर, भाई जगताप, कपिल पाटील, किरण पावसकर आणि मनिषा कायंदे, विद्या चव्हाण आदिंनी सहभाग घेतला.  
००००

अजय जाधव/विसंअ/2.7.19

000000मालाड दुर्घटना की उच्चस्तरीय जांच
45 सालों में रिकार्ड बारिश के कारण मुंबई के पानी निकासी करनेवाली यंत्रणा पर प्रभावित
राष्ट्रीय आपदा निवारण पथक सज्ज, मुख्यमंत्री ने दिलाया विश्वास
मुंबई : मालाड में जलापूर्ति व्यवस्था के नजीक की सुरक्षा दीवार ढहकर हुई दुर्घटना की उच्चस्तरीय जांच की जाएगी. मृतकों के परिजनों को राज्य सरकार और मुंबई महापालिका की ओर से पांच - पांच लाख रुपयों की मदद दी जाएगी. कल मुंबई में एक ही रात में 45 सालों में दूसरी बार बड़ी बारिश होने से पानी की निकासी करनेवाली यंत्रणा प्रभावित हुई है. माहुल पंपिंग स्टेशन का काम पूर्ण होने के बाद रेल पटरियों पर पानी जमा नहीं होगा. पश्चिम रेलवे की तरह मध्य रेलवेपर मायक्रो टनेलिंग का काम शुरू किया जाएगा, जिससे कि रेल सेवा नहीं रुकेगी, ऐसा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज विधानसभा में बताया.
सदस्य अजित पवार  के इस संदर्भ में स्थगन प्रस्ताव के माध्यम से चर्चा उपस्थित की थी. इसे उत्तर देते हुए मुख्यमंत्री बोल रहे थे.
मुख्यमंत्री ने इस समय कहा कि, मालाड में मृत हुए व्यक्तियों के प्रति सभागार द्वारा शोकसंवेदना व्यक्त की है. संपूर्ण सभागृह मृत व्यक्ती और घायलों के परिजनों के साथ है.  कल रात  जो बारिश हुई यह अभूतपूर्व है. चार से पाच घण्टे में 375 से 400  एमएम बारिश हुई है. 45 सालों में यह दूसरे क्रमांक की बारिश है. केवल तीन दिनों में  जून महीने की बारिश का औसत पार किया है. मुंबई की पानी निकासी की क्षमता को ध्यान में लेते हुए 24 घंटों में जब 150 मिमी बारिश होती है तब तक यह उचित काम करती है. लेकिन अत्यंत कम समय में बड़ी बारिश होने पर इस व्यवस्था पर विपरीत परिणाम होता है.
मालाड में जलापूर्ति व्यवस्था के पास स्थित सुरक्षा दीवार पर पानी जमा होकर बाद में वह दीवार गिर गई.  इस दुर्घटना में 18 लोग मृत हुए. कुल  75 लोग इस दुर्घटना में घायल हुए. 14 लोगों पर उपचार कर घर छोड़ दिया गया है. मैं खुद सुबह से इस घटना जानकारी ले रहा हूं. तड़के साढेचार बजे महापालिका आयुक्त ने फोन से इस घटना की जानकारी दी थी.  राष्ट्रीय आपदा निवारण दल और सभी यंत्रणा पर स्वयं ध्यान दिया. राज्यमंत्री योगेश सागर को तत्काल घटनास्थल पर भेजा. बाद में स्वयं हॉस्पिटल में जाकर घायलों से मिलकर पूछताछ की. उनके लिए  आवश्यक व्यवस्था की. उसके बाद महापालिका मुख्यालय के नियंत्रण कक्ष में जाकर मुंबई की सभी परिस्थिती की जानकारी ली. शहर में सभी जगहों पर सीसीटीवी लगाए गए है, उसके द्वारा कई भागों का लाइव चित्र देखा.  कुछ भागों में बारिश से पानी जमा हुआ है. जिन भागों में बारिश का पानी जमा होने का इतिहास है, ऐसे भागों में बारिश के पानी की निकासी करने की व्यवस्था महापालिका द्वारा खड़ी किए जाने से पानी की निकासी जल्दी हुई.
ब्रिमस्टोवॅड प्रकल्प के अंतर्गत मुंबई में 7 पंपिंग स्टेशन खड़े करने थे. इसमें से 7 में से 5 पंपिंग स्टेशन पूर्ण हुए है. पंपिंग स्टेशन की निर्मिति के लिए जगह, विभिन्न अनुमति, सीआरझेड, न्यायालयीन मामले आदि दिक्कते आती है.  इन दिक्कतों को निपटाने के लिए व्यक्तिगत ध्यान दिया है.  कांदलवन के कारण उच्च न्यायालय की अनुमति लेनी पड़ती है. माहुल और अन्य एक जगह के संदर्भ में प्रश्न कई वर्षों से प्रलंबित था. यह दोन स्टेशन होने के बगैर समस्या पूर्ण रूप से छूटेगी नहीं, ऐसी स्थिति थी. विशेषत: मिठागरों की जगह आवश्यक थी. इसके लिए आपदा व्यवस्थापन कानून का उपयोग कर यह जगह सक्ति के साथ अधिग्रहीत की. यह दो जगह अब महापालिका के अधिकार क्षेत्र में है. जल्द ही वहां पंपिंग स्टेशन का काम शुरू करेंगे. यह काम पूर्ण होने के बाद मुंबई में पानी जमा होने की समस्या बड़े पैमाने पर कम होगी, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
मुंबई की मिठी नदी, अन्य नदी-नालों की जगह पुनर्स्थापित करने की आवश्यकता है. मिठी नदी पर बड़े पैमाने पर लगाए गए अतिक्रमण हटाए गए हैं. हटवली आहेत. एमएमआरडीए सीमा पर काम खत्म हुआ है. महापालिका क्षेत्र के काम भी पूर्ण होने की कगार पर है. बाधितों को वैकल्पिक जगह दी गई है. शेष काम गति से पूर्ण किए जा रहे है.
गझदरबंध पंपिंग स्टेशन पूर्ण होने से इस वर्ष बड़ी राहत मिली है, ऐसा मुख्यमंत्री ने बताया.
नदी-नालों पर अतिक्रमन कर जहां नदी का पात्र/प्रवाह बदले गए है, इसके संदर्भ में कार्रवाई करने के निर्देश आज महापालिका में हुई बैठक में दिए है, ऐसी जानकारी मुख्यमंत्री ने सभागार को दी.
मुख्यमंत्री ने कहा, पिछले 3 सालों का डेटा और फूटेज उपलब्ध है. इसके आधारपर कहा, कैसे बारिश होती है. कहा उसे अवरोध होता है, कहा पानी जमा होता है, इसका अभ्यास कर आगे की कार्यवाही करेंगे. नालासफाई का टाइमटेबल निश्चित कर समय से पहले नाला सफाई  की नीति महापालिका द्वारा तैयार कर घोषित कर इस संदर्भ में कार्यवाही की जाएगी. रात में मुंबई पुलिस को 1700 ट्वीट आए. सभी जगहों पर पुलिस विभाग पहुंचा. महापालिका के आपदा व्यवस्थापन कक्ष को भी हजार से अधिक फोन कॉल आए. उन सभी स्थानों पर महापालिका के अधिकारी -कर्मचारी पहुंचे. रातभर महापालिका आपदा व्यवस्थापन अधिकारी कार्यरत थे. प्रशासन द्वारा परिस्थिती पर ध्यान दिया जा रहा है. अनुचित घटना न घटे इसके लिए सभी काम पूर्ण होने तक बारीकी से ध्यान दिया जाएगा. सभी लोग भी उचित सावधानी बरतें. इसके संदर्भ में निर्देश भी दिए है, ऐसा मुख्यमंत्री ने बताया.
आंबेगाव (त. हवेली, जि. पुणे) में भी दुर्घटना हुई है. सिंहगड इन्स्ट‍िट्यूट की दीवार पर पेड़ गिरने से झोपड़ियों के 6 कामगारों की मृत्यु हुई तथा 4 व्यक्ति घायल हुए है. वे मध्यप्रदेश और छत्तीसगढ़ के निवासी है. उनके परिजनों को आवश्यक  संपूर्ण मदद सरकार की ओर से दी जाएगी. साथ ही इस दुर्घटना की जांच करने के  निर्देश दिए है.  परसो पुणे में हुई दुर्घटना के बाद दिए निर्देश के अनुसार पुणे महापालिका ने 267 साईट की जांच की है, ऐसा मुख्यमंत्री ने बताया. 
हवामान विभाग की ओर से मराठवाडा और विदर्भ में अतिवृष्टी की इशारा दिया गया है. कई नदियों ने खतरों के निशान पार किए हैं. सभी यंत्रणा को निर्देश दिए गए है. अलग अलग विभागों में संभाव्य बाढ़ की स्थिति के बारे सूचना देकर आसपास के लोगों को स्थलांतरीत करने के निर्देश दिए है. आपदा से निपटने के लिए राष्ट्रीय आपदा निवारण दल (एनडीआरएफ) सज्ज है, ऐसी जानकारी मुख्यमंत्री ने इस समय दी. 

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा