महाराष्ट्रात ४१५ आयएएस आणि ३१७ आयपीएस अधिकारी; दोन वर्षात पदांमध्ये लक्षणीय वाढ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
        
        
नवी दिल्ली, दि. 25 : महाराष्ट्रात प्रशासकीय सोयीसाठी  आणि सुरक्षेच्यादृष्टीने महत्वाचे समजल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेचे (आयएएस) 415 आणि भारतीय पोलीस सेवेचे (आयपीएस )317 अधिकारी सद्य:स्थितीत कार्यरत आहेत.

गेल्यावर्षी घेण्यात आलेल्या आढाव्यानुसार 2016 ते 2018 या कालावधीदरम्यान महाराष्ट्रातील आयएएस व आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. राज्यात आयएएस अधिकाऱ्यांची संख्या 361 हून वाढून 415 झाली आहे तर आयपीएस अधिकाऱ्यांची संख्या 302 हून वाढून 317 झाली आहे. प्रधानमंत्री कार्यालय तथा कर्मचारी, जनतक्रार आणि निवृत्ती वेतन विभागाचे राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी राज्यसभेत लिखीत उत्तरात ही माहिती दिली.केंद्र शासनाकडून दर पाच वर्षांनी राज्यांच्या आवश्यकतेनुसार उपलब्ध करून देण्यात आलेल्या देशातील आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांचा आढावा घेण्यात येतो. याअंतर्गत वर्ष 2016 ते 2018 दरम्यान देशातील एकूण 10 राज्यांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 710 आयएएस अधिकारी असल्याची माहिती आहे. या आढाव्यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येत 361 हून 415 एवढी वाढ झाल्याचे चित्र आहे.

वर्ष 2016 ते 2018 दरम्यान केंद्रीय गृह मंत्रालयासह देशातील एकूण 13 राज्यांमधील आयपीएस अधिकाऱ्यांच्या पदांचा आढावा घेण्यात आला असून या राज्यांमध्ये एकूण 2 हजार 277 आयपीएस अधिकारी आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील आयएएस अधिकाऱ्यांच्या संख्येत 302 हून 317 एवढी वाढ झाली  आहे.               

महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलला फॉलो करा. http://twitter.com/MahaGovtMic 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा