शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने अधिकाधिक लोकाभिमुख योजना राबवाव्यात - आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 7 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाने अधिकाधिक लोकाभिमुख योजना राबवून आदिवासी बांधवांच्या सर्वांगीण विकासाची काळजी घ्यावी, असे प्रतिपादन महामंडळाचे अध्यक्ष तथा आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा यांनी आज येथे केले.त्यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे महामंडळाच्या संचालकांची सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते.
 
या सभेस महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील तसेच आदिवासी विभागाचे उपसचिव ल. ना. डोके, महाव्यवस्थापक उत्तम कावडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
   
महामंडळाच्या विविध उपक्रमांची या सभेत सविस्तर चर्चा झाली. यात प्रामुख्याने महामंडळामार्फत राबवण्यात येणारे भावी उपक्रम, महामंडळाचे संगणकीकरण तसेच कर्मचारी वर्ग व इतर अनुषंगिक बाबी याबाबत चर्चा झाली. महामंडळाने आगामी काळात जास्तीत जास्त लोकाभिमुख व लोकोपयोगी उपक्रम राबवून महामंडळ सक्षम करावे ज्यायोगे महामंडळाची महती व माहिती लोकांपर्यंत पोहोचेल असे श्री. सवरा यांनी सूचित केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा