कोंढवा दुर्घटनेच्या सखोल चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जखमींना 25 हजार रुपयांची मदत 

मुंबई, दि.29 : पावसामुळे इमारतीची संरक्षक भिंत कोसळून पुण्यातील कोंढवा येथे झालेल्या दुर्घटनेची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली असून घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. तसेच मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना 25 हजार रुपयांची मदतही जाहीर करण्यात आली आहे.

या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करतानाच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबियांबद्दल संवेदना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, बांधकाम मजूर रहात असलेल्या कच्च्या झोपडीवर रात्री दीडच्या सुमारास संरक्षक भिंत कोसळून झालेल्या जीवितहानीची घटना अतिशय दुर्दैवी आहे. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांना मी श्रद्धांजली वाहतो आणि जखमी व्यक्ती लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात, अशी ईश्वराकडे प्रार्थना करतो.
0000


मृतकों के परिजनों को पांच लाख तथा घायलों को 25 हजार रुपयों की मदद

मुख्यमंत्री ने दिए कोंढवा दुर्घटना की कड़ी जांच के आदेश

मुंबई : बारिश के कारण इमारत की सुरक्षा दीवार ढहकर पुणे के कोंढवा में हुई दुर्घटना की गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने ली है. इस घटना की कड़ी जांच करने के आदेश मुख्यमंत्री ने पुणे जिल्हाधिकरियों को दिए हैं. साथ ही घटना में मृतकों के परिजनों को पांच लाख और घायलों को 25 हजार रुपयों की मदद भी घोषित की है.
इस दुर्घटना के संदर्भ में शोक व्यक्त करते हुए मुख्यमंत्री ने मृतकों के परिवार के प्रति संवेदना व्यक्त की है. मुख्यमंत्री ने कहा, मजदूरों की कच्ची झोपड़ियों पर रात में डेढ़ बजे के करीब सुरक्षा दीवार ढहकर घटी यह दुर्घटना अत्यंत दुर्दैवी है. इस दुर्घटना में मृत हुए व्यक्तियों के प्रति मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूं और घायलों को जल्द से जल्द राहत मिलें ऐसी कामना करता हूँ, ऐसा मुख्यमंत्री ने कहा.
0000

Public relations office (Chief Minister Secretariat) 
                                                                 

Aid of Rs 5, 00,000 to relatives of deceased and Rs. 25,000 for injured
Chief Minister ordered detailed inspection of Kondhwa accident

Mumbai, 29.June.19: Chief Minister Devendra Fadanvis has taken serious note of the collapse of the building wall in Kondhwa, Pune due to rain and ordered the Pune District Collector to conduct a detailed inquiry of the incident. He declared aid of Rs 5 lakhs to relatives of deceased and Rs 25,000 for injured people.
While expressing condolences over the accident, the Chief Minister expressed grief for the families of the deceased and said that it was very unfortunate that the security wall collapsed on the huts of construction workers. The incident happened near about 1.30 am last night. Mr. Fadanvis paid homage to those who died in this accident and prayed to god for speedy recovery of the injured people.
0000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा