‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या शिरीन लोखंडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. १२ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात पालघर आणि मुंबई शहरच्या कामगार उपायुक्त शिरीन लोखंडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत गुरुवार दि. १३ आणि शुक्रवार दि. १४ जून रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून प्रसारित होणार आहे. निवेदिका रेश्मा बोडके यांनी ही मुलाखत घेतली आहे.


जागतिक बालकामगार विरोधी दिनाचे औचित्य साधून ही मुलाखत घेण्यात आली आहे. बालमजुरीचे दुष्परिणाम, बालमजुरी कमी करण्यासाठी कायद्यातील तरतुदी, बालमजुरांसाठीच्या शासनाच्या विविध योजना, राष्ट्रीय बालकामगार प्रकल्पाची माहिती आणि बालमजुरी कमी करण्यासाठी शासनाने केलेल्या उपाययोजना आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती लोखंडे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा