ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त उद्या चर्चासत्राचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 14 : ज्येष्ठ नागरिक धोरणातील तरतुदीनुसार  15 जून हा दिवस ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंध जागृती दिवस  म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्ताने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग  आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन ऑडिटरम हॉल, विद्यालंकार इन्स्ट‍िट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, संगमनगर, वडाळा (पूर्व) येथे उद्या सकाळी १०.३० वाजता करण्यात आले आहे.

या चर्चासत्राचे उद्‌घाटन सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास मुंबई शहरचे पालकमंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार राहुल शेवाळे, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे,  मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण,  समाजकल्याण विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर, हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
०००००

ज्येष्ठ नागरिक उत्पीड़न प्रतिबंधक
जागृति दिवस के अवसर पर कार्यक्रम
मुंबई, दि 14: ज्येष्ठ नागरिक नीति के प्रावधानों के अनुसार 15 जून को वरिष्ठ नागरिक उत्पीड़न प्रतिबंध जागृति दिवस के रूप में मनाया जाता है।  इस अवसर पर सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग तथा हेल्पेज इंडिया के संयुक्त तत्वावधान में चर्चा सत्र का आयोजन  ऑडिटोरियम हॉल, विद्यालंकार इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी, संगमनगर, वडाला (पूर्व) में आज सुबह 10.30  बजे  किया गया है।
इस चर्चा सत्र का उद्घाटन सामाजिक न्याय और विशेष सहायता विभाग के मंत्री राजकुमार बडोले के हाथों किया जाएगा।  इस कार्यक्रम में मुंबई शहर के पालक मंत्री सुभाष देसाई, सामाजिक न्याय व विशेष सहायता विभाग के राज्य मंत्री  दिलीप कांबले, सांसद राहुल शेवाले, महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामाजिक न्याय विभाग के प्रधान सचिव दिनेश वाघमारे, जनसंपर्क मुंबई के अतिरिक्त पुलिस आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, समाज कल्याण विभाग के आयुक्त मिलिंद शंभरकर, क्षेत्रीय उपायुक्त  समाज कल्याण मुंबई विभाग के बालासाहेब सोलंकी , हेल्पेज इंडिया के प्रकाश बोरगांवकर और अन्य मान्यवर उपस्थित रहेंगे।  सामाजिक न्याय विभाग द्वारा आवाहन किया गया है कि इस कार्यक्रम में अधिक से अधिक नागरिक उपस्थित रहें।

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा