अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ; समुद्रात न जाण्याचे मासेमारांना आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. 11: भारताच्या पूर्व मध्य व दक्षिण पूर्व अरबी समुद्रात ‘वायू’ चक्रीवादळ तयार झाले आहे. या वादळामुळे उद्या दि. 12 व दि. 13 जून रोजी महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्यावर वाऱ्याचा वेग वाढणार आहे. कोकण व गोव्यातील काही भागात वादळासह मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

भारताच्या पश्चिम-किनारपट्टीजवळ असलेल्या अरबी समुद्रात ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले आहे. मुंबईपासून दक्षिण, नैऋत्य दिशेने 630 किमी अंतरावर हे चक्रीवादळ स्थित असून येत्या 24 तासात ते आणखी तीव्र होणार आहे. हे वादळ गुजरात किनारपट्टीच्या दिशेने जाणार असल्यामुळे राज्यात हे वादळ धडकण्याची शक्यता नाही. परंतु त्याच्या प्रभावामुळे येत्या दोन दिवसात वाऱ्याचा वेग वाढणार आहे. तसेच किनारपट्टीच्या भागात व्यापक परिसरात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. उद्या दि. 12 जून रोजी किनारपट्टीच्या जवळ समुद्र खवळलेला असेल. दि. 13 जून रोजी कोकण किनारपट्टीच्या उत्तर भागात समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला असेल. त्यामुळे मासेमारांनी उद्या दि. 12 व गुरूवार दि. 13 जून रोजी अरबी समुद्रात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000


अरब सागर में वायु चक्रवात;

मछुआरों को समुद्र में नहीं जाने का आवाहन

मुंबई, दि. 11 :  भारत के पूर्व-मध्य और दक्षिण पूर्व अरब सागर में वायु चक्रवात उभरा हुआ है, इस चक्रवात के कारण कल १२ और १३ जून को महाराष्ट्र के समुद्र तट की हवा की गति बढ़ेगी। कोकण और गोवा के कुछ परिसर में तूफान के साथ मूसलाधार बारिश होने की संभावना है, इसलिए मछुआरों से समुद्र में नहीं जाने का आवाहन मौसम विभाग ने किया है।
भारत के पश्चिम-तट के समीप अरब सागर में वायू  चक्रवात उभरा है। मुंबई से दक्षिण, नैऋत्य दिशा से 630 किमी की दूरी पर यह चक्रवात है और अगले चौबीस घंटे में यह तूफान और तेज होगा। यह तूफान गुजरात तट की दिशा से जाने के कारण राज्य में यह तूफान आने की संभावना नहीं है, लेकिन इसके  प्रभाव के कारण अगले दो दिनों में हवा की गति बढ़ेगी। साथ ही तट के परिसर में तूफानी बारिश होने की संभावना बताई गई है। कल दि. 12 जून को तट के समीप समुद्र का तूफानी रंग दिखाई देगा। वहीं  दि. 13 जून को कोकण तट के उत्तर परिसर में समुद्र का बड़े पैमाने पर तूफानी रंग होगा। इसलिए मछुआरों से कल बुधवार दि. 12 और गुरुवार दि. 13 जून को अरब सागर में नहीं जाने का आवाहन किया गया है।
००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा