‘दिलखुलास’मध्ये 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९’ या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात 'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९या विषयावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष कार्य अधिकारी प्रिया खान यांची माहिती स्वरूपातील विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत बुधवार दि. १२ जून रोजी राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या फेलोशिपविषयी आपल्या भावना या कार्यक्रमादरम्यान व्यक्त केल्या आहेत.                               

'मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम २०१९हा कार्यक्रम नेमका काय आहे, ही फेलोशिप सुरू करण्यामागची उद्दिष्टे, या फेलोशिपचा लाभ घेण्यासाठीची पात्रता, फेलोशिपचे स्वरूप, निवड झालेल्या तरुणांना कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाते आदी विषयांची सविस्तर माहिती श्रीमती खान यांनी दिलखुलासकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा