उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये ‘नंद्रजोग’ असे उच्चारण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 6 : उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंद्रजोग यांचे आडनाव मराठी भाषेत नंद्रजोगअसे लिहावे, अथवा उच्चारावे, असे आवाहन विधी व न्याय विभागाने केले आहे.

श्री. नंद्रजोग यांची नुकतीच उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचे आडनाव मराठीत विविध पद्धतीने उच्चारले जात आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने मुख्य न्यायमूर्तींचे आडनाव मराठीमध्ये नंद्रजोग असे उच्चारण्यास/लिहिण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे विधी व न्याय विभागाच्या परिपत्रकात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा