'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 13 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित जय महाराष्ट्र  कार्यक्रमात शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची 'दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण' या विषयावर मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर उद्या शुक्रवार दि. 14 जून रोजी संध्याकाळी 7:30 वाजता प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


दहावी व बारावी नंतरच्या महाविद्यालयीन प्रवेश प्रक्रियेबाबत शालेय शिक्षण विभागाचे महत्त्वपूर्ण निर्णय, विद्यार्थ्यांना आनंददायी आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, प्रगत ‍शैक्षणिक महाराष्ट्र व मूल्यवर्धन शिक्षण या उपक्रमाची व्याप्ती, राज्यातील शाळा 15 जून रोजी सुरू होत आहेत त्यानिमित्त केलेल्या आवाहनाबाबत सविस्तर माहिती श्री. तावडे ‍यांनी जय महाराष्ट्रकार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा