सिंचन सुविधांमुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतकाळेश्वरम प्रकल्प उद्घाटनाच्या निमंत्रणासाठी तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट


मुंबई, दि. 14 : सिंचन सुविधामुळेच शेतकऱ्यांच्या उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. त्यामुळेच काळेश्वरमसारख्या प्रकल्पांची आणि त्यासाठी राज्यांच्या परस्पर सहकार्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले.  तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज येथे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन तेलंगणातील महत्त्वाकांक्षी अशा काळेश्वरम सिंचन प्रकल्पाच्या उद्घाटनाचे निमंत्रण दिले. त्यावेळी चर्चेत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भावना व्यक्त केल्या.


याप्रसंगी जलसंपदामंत्री गिरीष महाजन, तेलंगणाच्या मंत्रिमंडळातील सदस्य आदी उपस्थित होते.


तेलंगणा राज्यातील या प्रकल्प उद्घाटनाचे निमंत्रण स्वीकारतानाच मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी  तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. राव यांच्या दूरदृष्टीचे आणि या प्रकल्पपूर्तीच्या वेगाचेही कौतुक केले. ते म्हणाले, सिंचन सुविधांच्या निर्मितीतूनच लोकांच्या जीवन उन्नतीचा मार्ग प्रशस्त होतो. भारतीय अर्थव्यवस्था ही कृषी केंद्रित आहे. त्यामुळे कृषी सिंचन सुविधेच्या क्षमतेतून भारतीय अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळते. त्यामुळे महाराष्ट्रातही आम्ही सिंचन सुविधांच्या बळकटीकरणावर भर दिला आहे. त्याचसाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारख्या महत्त्वाकांक्षी योजनेला वेग देण्याचा प्रयत्न आहे. समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी नदीत आणल्यामुळे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भात सिंचनासाठी पाणी मिळणार आहे. या ग्रीडमध्ये अकरा धरणांना जोडण्यात येणार आहे. यामुळे वारंवार अवर्षणाला तोंड देणाऱ्या या भागाला मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांसाठी राज्या-राज्यातील पाणी वाटपाबाबत संवाद वाढीस लागणेही गरजेचे आहे. त्यादृष्टीने काळेश्वरम हा प्रकल्प देशासाठी एक उत्तम उदाहरण ठरेल, असेही  मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.


तेलंगणाचे मुख्यमंत्री श्री. राव यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे महाराष्ट्र राज्याने या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी दिलेल्या सर्वतोपरी सहकार्यासाठी आभार व्यक्त केले. ते म्हणाले, महाराष्ट्राच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे शक्य नव्हते. अनेक बाबतीत आपल्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्णत्वास जाऊ शकला. महाराष्ट्राने या प्रकल्पासाठी केलेले सहकार्य तेलंगणाची जनता कधीही विसरणार नाही. हा प्रकल्प पुढील अनेक पिढ्यांसाठी त्यांच्या भविष्याला  आकार देणारा ठरणार आहे. त्यामुळे या पिढ्याही महाराष्ट्राप्रती कृतज्ञच राहतील.


या प्रकल्पाचे शुक्रवारी 21 जून रोजी उद्घाटन होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विशेष निमंत्रित करण्यात आले.


मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी निमंत्रणाचा स्वीकार करतानाच मुख्यमंत्री श्री. राव यांचा सत्कार करून त्यांना, शिवछत्रपतींच्या प्रतिमेची कलाकृती भेट दिली. श्री. राव यांनीही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचा तेलंगणाच्या परंपरेप्रमाणे सत्कार केला.
००००Telangana CM calls on CM Fadanvis to invite him for Kaleswaram Project
Irrigation facilities only can pave the way for farmers’ progress- Devendra Fadanvis
Mumbai, June 14: Irrigation facilities alone can pave the way for farmers’ progress and therefore for this mutual cooperation between states and projects like Kaleswarm are needed, said Chief Minister Devendra Fadanvis here today.
Telangan Chief Minister K Chandrqasekhar Rao today called on Chief Minsiter Devendra Fadanvis to extend an invitation to him for inauguration of ambitious Kaleswaram irrigation project of his state. It is on this occasion Fadanvis expressed his thoughts.
Water Resources Minister Girish Mahajan, cabinet members of Telangana and others were present on this occasion.
Accepting the invitation from CM Rao, Fadnvis praised his leadership for his vision and speed to complete the project. He said that irrigation facilities only can pave the way for development and progress and uplifting the life standards of the people. Indian economy is farm based and as such irrigation facilities help in consolidating the economy also. That is why in Maharashtra emphasis is laid on providing irrigation facilities, Fadanvis said. Efforts are on to speed up Marathwada Water Grid scheme. With water merging into sea is being brought into Godavari river to provide water to Marathwada and Vidarbha regions. Eleven dams will be connected in this scheme and this will help overcome the drought conditions in this region. It is necessary to have water sharing dialogue between the states for this purpose and Kaleswaram project will be the best example for the country to follow, CM Fadanvis said.
Telangana CM Rao thanked his counterpart for extending all cooperation for the completion of this project. He said it was not possible to complete this project without the cooperation of Maharashtra. We could complete this project due to timely help and cooperation in many respects from your end. People of Telangana will never forget this gesture of Maharashtra, he said. This project will be instrumental in shaping the better future of posterity and these generations will also be indebted to Maharashtra for this, he added.
This project will be inaugurated on June 21 and CM Devendra Fadanvis is specially invited for this inauguration function.
Accepting the invitation CM Fadanvis presented a replica of Chhatrapati Shivaji Maharaj and honoured him.  Rao too felicitated Fadanvis as per the traditions of Telangana.  

0000


तेलंगाना के मुख्यमंत्री की ओर से कालेश्वरम प्रकल्प का उद्घाटन के निमंत्रण देने के लिए मुलाकात
सिंचाई सुविधाओं के कारण किसानों की उन्नति का मार्ग प्रशस्त
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : सिंचाई सुविधाओं के कारण किसानों की उन्नति का मार्ग प्रशस्त होता है. इसी वजह से कालेश्वरम जैसे प्रकल्प और उसके लिए राज्य के परस्पर सहयोग की आवश्यकता है, ऐसा  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने आज कहा. तेलंगाना के मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव ने आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस से वर्षा निवासस्थान पर मुलाकात कर तेलंगाना के महत्त्वाकांक्षी कालेश्वरम सिंचाई प्रकल्प के उद्घाटन का न्यौता दिया. इस समय हुई चर्चा में मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने अपनी भावना व्यक्त की.
इस अवसर पर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तेलंगाना के मंत्रिमंडल के सदस्य आदि उपस्थित थे.
तेलंगणा राज्य के इस प्रकल्प उद्घाटन का निमंत्रण  स्वीकारते हुए मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने मुख्यमंत्री श्री. राव की दूरदृष्टी और  प्रकल्पपूर्ति के गति की सराहना की. उन्होंने कहा कि, सिचाई  सिंचन सुविधा की  निर्मिती से लोगों के जीवन उन्नती का मार्ग प्रशस्त होता है. भारतीय अर्थव्यवस्था कृषि कृषी केंद्रीत है. इसलिए  कृषी सिंचाई सुविधा के क्षमता से भारतीय अर्थव्यवस्था को मजबूती मिलती है. इसलिए हमने महाराष्ट्र में भी सिंचाई सुविधाओ के मजबूती पर जोर दिया है. इसके लिए मराठवाडा वाटर ग्रीड जैसी महत्त्वाकांक्षी योजना को गति देने का प्रयास किया है. समुंदर में बहकर जानेवाला पानी गोदावरी नदी में लाने के कारण मराठवाडा और पश्चिम विदर्भ में सिंचाई के लिए मिलेगा. इस ग्रिड में 11 बांधों को जोड़ा जाएगा. इसलिए हमेशा अवर्षण का सामना करनेवाले क्षेत्र को राहत मिलेगी. सिंचाई प्रकल्पों के लिए राज्य-राज्यों में पानी वितरण के संदर्भ में संवाद बढ़ना जरूरी है.  इस दृष्टि से कालेश्वरम प्रकल्प देश के लिए एक उत्तम उदाहरण साबित होगा, ऐसा  मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने बताया.
मुख्यमंत्री श्री. राव ने मुख्यमंत्री श्री. फडणवीस का महाराष्ट्र राज्य द्वारा इस प्रकल्प के पूर्णत्त्व के लिए दिए सहयोग के लिए आभार प्रकट किया. उन्होंने कहा कि, महाराष्ट्र के सहयोग के बिना यह प्रकल्प संभव नहीं था. कई स्थानों पर आपसे मिले सहयोग के कारण ही यह प्रकल्प पूर्ण हो सका. महाराष्ट्र द्वारा इस प्रकल्प के लिए दिए सहयोग को तेलंगाना की जनता कभी नहीं भूलेगी. यह प्रकल्प आनेवाली कई पीढ़ियों के लिए कारगर साबित होगा. वे पीढियां भी महाराष्ट्र के प्रति कृतज्ञ रहेगी. 
इस प्रकल्प का शुक्रवार 21 जून को उद्घाटन होगा. इसके लिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को विशेष निमंत्रित किया गया.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस ने इस निमंत्रण का स्वीकार कर मुख्यमंत्री श्री. राव का सत्कार किया. इस समय उन्हें शिवछत्रपती की प्रतिमा की कलाकृती भेंट दी.  श्री. राव ने भी मुख्यमंत्री श्री. फडणवीस का तेलंगणा की परंपरा के अनुसार सत्कार किया.

००००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा