‘दिलखुलास’कार्यक्रमात सोमवारपासून 'नागरी सेवा परीक्षेची तयारी' या विषयावर मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 17 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलासकार्यक्रमात नागरी सेवा परीक्षेची तयारीया विषयावर यंदा नागरी सेवा परीक्षेत राज्यात प्रथम आणि देशात 16 वा क्रमांक पटकावलेल्या तृप्ती धोडमिसे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून सोमवार दि. 20, मंगळवार दि. 21, बुधवार दि.22 आणि गुरुवार दि 23 मे रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदिका उत्तरा मोने  यांनी ही मुलाखत घेतली आहे.


नागरी सेवा परीक्षेची तयारी, त्यात येणाऱ्या अडचणी, स्वप्नपूर्तीसाठी करावी लागलेली कसरत, पूर्व-मुख्य आणि मुलाखतीची तयारी, मराठी माध्यमातून उपलब्ध असलेले साहित्य, एक अभियंता ते सनदी अधिकारी पर्यंतचा यशस्वी प्रवास आदी विषयांची माहिती  श्रीमती  धोडमिसे   यांनी दिलखुलास' या कार्यक्रमातून  दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा