राज्यपालांकडून गुढी पाडव्याच्या शुभेच्छा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : राज्यपाल चेन्नमनेनी विद्यासागर राव यांनी राज्यातील जनतेला गुढी पाडवा तसेच मराठी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


गुढी पाडव्याच्या या आनंददायी सणानिमित्त मी राज्यातील तसेच जगभरातील सर्व महाराष्ट्रीय लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण तसेच नववर्ष सर्वांच्या जीवनात सुख, समाधान व समृद्धी घेऊन येवो. हा सण विविध भाषिक लोक युगादि, चेती चाँद तसेच संवर पाडवो म्हणून देखील साजरा करतात. यानिमित्‍ताने मी सर्वांना त्यांच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा देतो; असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा