विविध क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज पाठविण्याचे आवाहन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि. २५ : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम खेल मंत्रालय नवी दिल्ली यांच्या तर्फे सन २०१९ साठी विविध पुरस्कारांकरिता अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

युवा कार्यक्रम व खेल मंत्रालयामार्फत दरवर्षी ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कार, राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार आणि अर्जुन पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्कारांसाठी येत्या ३० एप्रिलपर्यंत अर्ज करता येतील. या पुरस्काराबाबतची सविस्तर माहिती आणि अर्जाचा नमुना http://yas.nic.in/sports या वेबसाईटवर उपलब्ध आहे.

अधिक माहितीसाठी मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा