ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोशिएनशच्या बेवसाईटचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ४ : ऑल इंडिया इलेक्ट्रॉनिक असोशिएशनच्या (पश्चिम विभाग) www.aiea.in एआयईए डिजिटल २.० या वेबसाईटचे उद्घाटन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते आज येथे झाले.

यावेळी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, संघटनेचे सचिव मितेश मोदी, विश्वनाथ साबुजी आदी उपस्थित होते. संघटनेचे कार्य, शासनच्या योजना प्रत्येक सदस्यांपर्यंत पोहोचण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.


भारतात इलेक्ट्रॉनिक वस्तुंचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. त्यातून कोट्यावधींची उलाढाल होते. या क्षेत्राचा विस्तार होण्यासाठी राज्य शासनाने प्रयत्न करावेत. जीएसटीचा दर कमी करण्याची गरज देखील यावेळी व्यक्त करण्यात आली. इलेक्ट्रॉनिक वस्तुंसाठी पाच टक्क्यांपर्यंत जीएसटी यावा, असे आढळराव पाटील यांनी सांगितले.


यावेळी श्री.देसाई म्हणाले, आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तुशी निगडीत असतो. आपण इलेक्ट्रॉनिक वस्तूपासून दूर राहू शकत नाही. महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रॉनिक धोरण आखले असून याद्वारे या क्षेत्राला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. नव्या औद्योगिक धोरण आखले जात असून यामध्ये इलेक्ट्रॉनिक क्षेत्रासाठी विशेष सुविधा देण्यावर शासनाचा भर राहणार आहे, असेही ते म्हणाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा