मुंबईत मंगळवारपासून महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयामार्फत ५९ वे महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन ८ ते १४ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात आले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून उच्च व तंत्र विभागाचे राज्यमंत्री रवींद्र वायकर, आमदार  राज पुरोहित, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आदी उपस्थित राहणार आहेत.

या प्रदर्शनाचे उद्घाटन मंगळवार दि. ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वा जहांगीर आर्ट गॅलरी, मुंबई येथे होणार असून चित्रकला, शिल्पकला, अपलाईड आर्ट, ग्राफिक आणि हॅन्डकॅप अशा एकूण १५ विविध विषयातील कलाकार विजेत्यांना यावेळी पुरस्कृत करण्यात येणार आहे.


प्रदर्शन ८ ते  १४ जानेवारी या कालावधीत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार असून इच्छुकांनी या प्रदर्शनाला भेट देण्याचे आवाहन कला संचालनालयाचे संचालक राजीव मिश्रा यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा