कोकण खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी सुनील पोरवाल

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 1 : राज्य माहिती आयोगाच्या कोकण खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त म्हणून गृह विभागाचे निवृत्त अपर मुख्य सचिव सुनील पोरवाल यांनी शपथ घेतली. श्री. पोरवाल यांना राज्याचे मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी पदग्रहणतेची शपथ दिली.

या प्रसंगी मुख्य सचिव डी. के. जैन, मदत व पुनर्वसन विभागाच्या अपर मुख्य सचिव मेधा गाडगीळ, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू. पी. एस. मदान, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव बिपीन मल्लिक, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव श्यामलाल गोयल, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, बृहन्मुंबई खंडपीठाचे राज्य माहिती आयुक्त अजित कुमार जैन, वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, जलसंधारण व रोजगार हमी विभागाचे सचिव एकनाथ डवले, माजी अपर मुख्य सचिव भगवान सहाय, एस. एस. संधू यावेळी उपस्थित होते. 
000
सचिन गाढवे/वि.सं.अ./1.1.2019   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा