कोकणातील कुणबी समाजाच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 1 :  रायगड, ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या विविध प्रलंबित प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी कार्यवाही करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले.


कोकणातील कुणबी समाजाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या शिष्टमंडळासमवेत बैठक झाली. बैठकीस आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, खासदार कपिल पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यू.पी.एस. मदान, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव,  विजाभज, इमाव विमाप्र विभागाचे सचिव जे. पी. गुप्ता, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेश लड्डा,  कोकण विभागीय आयुक्त डॉ. जगदीश पाटील, रायगडचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


यावेळी शिष्टमंडळातील आमदार अनिकेत तटकरे, सुनील तटकरे, धैर्यशील पाटील, किशन कथोरे, कुणबी समाज संघटनेचे शंकरराव म्हसकर, विनय नातू तसेच पदाधिकारी, सदस्य यांनी विविध प्रश्नांबाबत मांडणी केली.त्यावर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी विविध निर्देश दिले. या तीन जिल्ह्यातील बेदखल कुळांबाबतची प्रकरणे निकाली काढण्यासाठी विभागीय आयुक्त आणि तीनही जिल्हाधिकारी यांनी ग्रामीण तसेच नागरी क्षेत्रातील जमिनींबाबत अभ्यास अहवाल द्यावा. समाजाची तीनही जिल्ह्यात वसतिगृह उभारणीसाठी जमिनींचा शोध घ्यावा, त्यामध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन- प्रशिक्षण, जात पडताळणी व वैधता प्रमाणपत्रासाठीची प्रक्रिया सुलभीकरण, खासगी-वने संज्ञेतील जमिनी मुक्त करणे, कुणबी उच्चाधिकार समितीच्या काही शिफारशी तसेच स्थापन उपकंपनीला निधी उपलब्ध करून देणे, यांसह चर्चेतील विविध मुद्यांवरील निर्देशांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा