'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्या उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि.27: माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात उद्योगसुलभ धोरणया विषयावर उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि.28 डिसेंबर रोजी संध्याकाळी 7.30 ते 8.00 या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


उद्योजकांना स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्योजकांसाठी विशेष प्रोत्साहन योजना, उद्योग संचालनालयामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची महत्त्वपूर्ण भूमिका, भांडवली अनुदानासाठी आवश्यक पात्रता, व्यवसायाला वाढविण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, खासगी उद्योजकांचा या धोरणात सहभाग याबाबतची माहिती श्री. कांबळे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे. या कार्यक्रमात उद्योजकांचासुद्धा सहभाग आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा