‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या आणि परवा सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित 'दिलखुलास' कार्यक्रमात सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांची मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून गुरुवार दि. 6 आणि शुक्रवार दि. 7 डिसेंबर रोजी सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

राज्याच्या दिव्यांग धोरणाला मंत्रिमंडळाची मिळालेली मंजुरी, धोरणासाठी करण्यात आलेला पाठपुरावा, दिव्यांग धोरण 2018 ची वैशिष्ट्ये, दिव्यांगांना होणारा फायदा, धोरणात दिव्यांग मुले व स्त्रिया, निर्वाह भत्ता व निवृत्ती वेतन, उद्योग, घरबांधणीचा करण्यात आलेला विचार, मनोरंजन केंद्रांचा समावेश आदी विषयांची माहिती श्री. बडोले यांनी ‘दिलखुलास’ कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा