जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त सोमवारी कार्यक्रमाचे आयोजन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 5 : जागतिक मानवी हक्क दिनानिमित्त राज्य मानवी हक्क आयोगातर्फे 10 डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे सकाळी 10.30 वा. कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.


या कार्यक्रमास मुख्य अतिथी सुप्रीम कोर्टाच्या माजी न्यायमूर्ती श्रीमती सुजाता व्ही मनोहर तर अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे कार्यकारी अधिकारी एम.ए.सय्यद असणार आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाचे मुख्य संचालक विनीत अग्रवाल, राज्याचे माजी मुख्य सचिव व लोकसेवा हक्क आयोगाचे मुख्य आयुक्त स्वाधीन क्षत्रिय, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सचे अधिष्ठाता अरविंद तिवारी आणि आंतरराष्ट्रीय न्याय आयोगाचे क्षेत्रीय संचालक संजय मॅकवन आदींचीही उपस्थिती राहणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा