मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे नागपूर विमानतळावर भव्य स्वागत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

           
                     


नागपूर दि.3 : मराठा समाजाला आरक्षण जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे  विमानतळावर प्रथमच आगमन झाल्यानंतर  सकल मराठा समाज, मराठा सेवासंघ,तिरळे कुणबी मंडळ, विविध संस्था, संघटना तसेच जनतेच्या वतीने भव्य स्वागत करण्यात आले.  यावेळी विमानतळावर मोठ्या संख्येने  नागरिक उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले.  यावेळी आमदार सुधाकर कोहळे, सुधाकर देशमुख, कृष्णा खोपडे, डॉ. मिलिंद माने, गिरीश व्यास, विकास कुंभारे, उपमहापौर  दिपराज पार्डीकर स्थायी समितीचे अध्यक्ष विरेंद्र कुकरेजा तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाबद्दल जनतेच्या वतीने आभार व्यक्त केले.

विमानतळावर मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक एकत्र आले होते. यावेळी संदल व ढोल-ताशे वाजवून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित जनसमुदायामध्ये जाऊन शुभेच्छांचा स्वीकार केला.  विमानतळावर सकल मराठा समाजाचे प्रतिनिधी, मराठा सेवा संघ तसेच तिरळे कुणबी सेवा संघ आणि विविध संघटना, व्यक्ती व संस्थांच्या प्रतिनिधींनी मराठा समाजाला आरक्षण दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार व्यक्त केले.

यावेळी रमेश चोपडे, कृष्णा बोराटे, नाना सातपुते, राजेश ढोक, गोपाल बेहरे, प्रभाकर येवले, श्रावण अखंड, ॲड. संजय डोईफोडे, रामदास साबळे, प्रदिप कदम, सुरेंद्र वाघ, प्रकाश भोयर, किशोर वानखडे, डॉ. संजय ढोक, विनोद बोरकुटे,श्रीमती प्रियंका पोतदार, नंदा बीरे, संगीता वऱ्हाडे, अर्चना सोलव, वैशाली भटकर, आरती सालव, ममता डुकरे यासोबतच नगरसेवक, विविध संस्थांचे प्रतिनिधी विमानतळावर उपस्थित होते.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा