तुर्कीच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. 5 : तुर्की देशातील शिष्टमंडळाने आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची मंत्रालयात भेट घेतली. तुर्की व भारतामध्ये अनेक वर्षांपासून सलोख्याचे संबंध आहेत. ते येत्या काळात अधिक दृढ करण्यावर भर देण्यात येईल, असे यावेळी शिष्टमंडळाने सांगितले. दरम्यान, यावेळी तुर्की व महाराष्ट्र यांच्यामधील व्यापार आणि गुंतवणूक वृद्धिंगत करण्याबाबत उभयतांमध्ये चर्चा झाली.
 

तुर्कीच्या अनेक कंपन्या सध्या देशात कार्यरत आहेत. विशेषतः ऑटोमोबाईल क्षेत्रात काम करत आहेत. महाराष्ट्रात तुर्कस्थानमधील कंपन्यांसाठी स्वतंत्र औद्योगिक पार्क उभारण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी केली. त्याला उद्योगमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. जपान, चीनप्रमाणे तुर्कीच्या उद्योगांसाठी स्वतंत्र औद्योगिक पार्कसाठी मदत केली जाईल, याशिवाय पाणी, जमीन व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याची ग्वाही श्री, देसाई यांनी दिली. शिष्टमंडळामध्ये तल्हा कराटास, नेकमिटन केमाझकौशल शहा, विशाल जाधव आदींचा सहभाग होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा