लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली ‘महावॉकेथॉन’ची नोंद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. २५ : महाराष्ट्रातील ५०३ ठिकाणी एकाच वेळी १८ नोव्हेंबर रोजी महावॉकेथॉन रॅलीस सुरुवात करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ५ लाख ७ हजार ३६७ नागरिकांनी महावॉकेथॉन २०१८ मध्ये सहभाग घेतला व याची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेतली आहे. महावॉकेथॉन हा कार्यक्रम सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, सीएएसआय ग्लोबल आणि सीएसआर डायरीद्वारे रस्ते सुरक्षा, नो हॉकिंग, जबाबदारीपूर्वक वाहन चालवण्याचा प्रचार करण्यासाठी घेण्यात आला. १८  नोव्हेंबर रोजी सकाळी  वाजता मंत्रालय प्रांगणातून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी झेंडा दाखवून महावॉकेथॉन रॅलीस सुरुवात केली.


सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएमव्हीडी, मुंबई अग्निशमन दल, मुंबई पोलीस दल, टपाल खाते व इतर शासकीय विभाग, क्रिकेट क्लब, डॉक्टरांचे क्लब, रोटरी क्लब, डांन्स क्लब, लायन्स क्लब, वरीष्ठ नागरीक क्लब. सेवाभावी संस्था, निवासी संकुले, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे, बँका आणि खाजगी संस्था, नोकरवर्ग,विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय यांनी महावॉकेथॉनमध्ये २ कि.मी.चालून सहभाग घेतला. महाराष्ट्रातील ५०३ ठिकाणी महावॉकेथॉन रॅलीचे नेतृत्व व समन्वय साधणाऱ्या नेतृत्वाचा डिसेंबर,जानेवारी दरम्यान गुणगौरव करण्याचा मानस आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा