गरजू शेतकऱ्यांचा आधार : स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतकै.एकनाथ पांडुरंग पाटील यांचा मृत्यू मोटर अपघाताने झाला. सदर व्यक्ती ही शेतकरी असल्याने त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींना स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळतो, असे समजताच कै.एकनाथ पाटील यांच्या पत्नी श्रीमती कमलाबाई पाटील यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता करून तलाठी कार्यालयाकडे अर्ज केला. तद्नंतर या घटनेची तालुका व कृषी कार्यालयाने चौकशी करून मृत व्यक्तींच्या वारसास म्हणजे पत्नी व मुलास २ लाख रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.


महाराष्ट्र सरकारने अशा योजना गरीब गरजू शेतकरी ज्यांना स्वतःचा अपघात किंवा खाजगी विमा काढू शकत नाही, अशांना महत्त्वाचा आधार दिला आहे. त्याबाबत श्रीमती कमलाबाई पाटील यांनी शासनाचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा