महाराष्ट्र डाक विभागाची २६/११ च्या शहिदांना श्रद्धांजली 'शहिदों को श्रद्धांजली' स्पेशल कव्हरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. २६ : मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला आज १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल महाराष्ट्र पोस्ट विभागातर्फे शहिदांना श्रद्धांजली म्हणून काढण्यात आलेल्या 'शहिदों को श्रद्धांजली' या स्पेशल कव्हरचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विधानभवन येथे झाले.


यावेळी पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर, मुंबई पोलीस आयुक्त सुबोध कुमार जैस्वाल, सहपोलीस आयुक्त देवेन भारती, मुख्य पोस्ट मास्टर जनरल एच.सी. अग्रवाल, पोस्ट मास्टर जनरल शोभा मधाळे उपस्थित होते.


या कव्हरमध्ये दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या १८ पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पद आणि त्यांच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा