'दिलखुलास'मध्ये उद्या मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई, दि. २३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित दिलखुलास कार्यक्रमात वाचन प्रेरणा दिनानिमित्त फिरते ग्रंथालय आणि वाचनदूत सेवाया विषयावर शालेय शिक्षण आणि मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून बुधवार दि. २४ आणि गुरूवार दि. २५ ऑक्टोबर  रोजी  सकाळी ७.२५ ते ७.४० या वेळेत प्रसारित होणार आहे.  निवेदिका उत्तरा मोने यांनी ही मुलाखत घेतली आहे.
शासन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने १५ ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून साजरा करते. शासनातर्फे प्रत्येक शाळेत डॉ. अब्दुल कलाम वाचन कट्टा, ‘वाचू आनंदेतासिका संकल्पना, भिलार येथील वाचनध्यास उपक्रम, पंचवटी आणि डेक्कन क्वीन या रेल्वेत सुरू करण्यात आलेले विनाशुल्क फिरते ग्रंथालय आणि वाचनदूत सेवा या उपक्रमाबाबतची माहिती श्री. तावडे यांनी 'दिलखुलास' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा