'जय महाराष्ट्र' मध्ये उद्या वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची मुलाखत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ११ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमात '१३ कोटी वृक्ष लागवड अंमलबजावणी' या विषयावर वन विभागाचे सचिव विकास खारगे यांची विशेष मुलाखत घेण्यात आली आहे. या मुलाखतीचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून शुक्रवार दि. १२ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७.३० ते ८ या वेळेत प्रसारित होणार आहे. निवेदक शैलेश पेठे यांनी ही मुलाखत घेतली आहे.


वन पर्यटन, इको टूरिझमचे महत्त्व, हॅलो फॉरेस्ट, हरित सेना, बांबू विकास संशोधन, वनक्षेत्र वाढविण्यासाठी अंमलात आणलेल्या उपाययोजना, वृक्ष लागवडीसंदर्भातील पुणे जिल्ह्यातील यशोगाथा, वृक्ष लागवडीच्या यावर्षी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमात लोकसहभाग आणि प्रशासनाच्या समन्वयाबाबतची माहिती श्री. खारगे यांनी 'जय महाराष्ट्र' कार्यक्रमातून दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा