‘अब खुले में बंद पोस्टर’चे राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई, दि. ३ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपासून सुरु करण्यात आलेल्या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने आता उघड्यावर बंद (खुले में बंद) हे अभियान भारतीय स्त्री शक्ती संस्थेने सुरु केले आहे. याअंतर्गत एका पोस्टरचे प्रकाशन आज राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. याप्रसंगी शिक्षण मंत्री विनोद तावडे, आमदार मंगलप्रभात लोढा, भारतीय स्त्री शक्तीचे पदाधिकारी उपस्थित होते.


भारतीय स्त्री शक्ती संस्थेने स्त्रियांच्या स्वच्छ आणि सुरक्षित स्वच्छतागृहांचा आग्रह मागील अनेक वर्षांपासून धरला आहे. महिलांसाठी जास्तीत जास्त स्वच्छतागृहे निर्माण व्हावीत यासाठी भारतीय स्त्री शक्ती संस्थेच्यावतीने प्रयत्न सुरु आहेत. तसेच पुरुषांसाठीही स्वच्छतागृहे असावीत असा आग्रहही संस्थेने धरला आहे. सार्वजनिक ठिकाणी मलमूत्र विसर्जन करणे ही सर्वांसाठीच लाजिरवाणी बाब आहे. रस्त्यावर लघवी करणे हे आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे सार्वजनिक स्वच्छतागृहाची निर्मिती आवश्यक असल्याचा प्रसार संस्थेच्या अभियानामार्फत केला जाणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा