प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धाडीत कांदिवली परिसरातून दीड टन प्लास्टिक पिशव्या जप्त

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. 5 : संपूर्ण राज्यभर प्लास्टिक बंदीची मोहीम शासनाने तीव्र केली असून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मुंबईत घातलेल्या धाडीत सुमारे दीड टन प्लास्टिक पिशव्या व प्लास्टिक रोल जप्त केला आहे.


मुंबई आणि राज्यभरात गेल्या काही दिवसापासून प्लास्टिकचा अनधिकृतपणे वापर होताना दिसून येत आहे. या प्लास्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत असून जल प्रदूषणामुळे आरोग्यावर परिणाम होत आहे.


आज मुंबईतील कांदिवली पूर्व भागातील हनुमान नगरात असलेल्या ‘उमर प्लास्टिक पेपर्स’ या दुकानावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून सुमारे दीड टन प्लास्टिकचा साठा जप्त करुन संबंधिताला पाच हजार रुपये दंड ठोठावला आहे.


या कारवाईत महंमद खान, एस. बी. माने, संजय भोसले, स. ह. पडवळ, डी. पी. कोपरकर, मधुकर इगवे, गजानन पवार, अजित देशमुख, संदिप पाटील आदींनी भाग घेतला.
००००

डॉ. संभाजी खराट/विसंअ/5/10/18

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा