संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसन प्रश्नांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
मुंबई, दि. 4 :  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील तसेच आरे येथील पात्र अतिक्रमणधारकांच्या पुनर्वसनासंदर्भातील  विविध प्रश्नांचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला.


बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी,  म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद म्हैसकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर, वन विभागाचे सचिव विकास खारगे यांच्यासह संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे अधिकारी उपस्थित होते.संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनास पात्र झोपडपट्टीधारक तसेच आदिवासी पाड्यांमधील कुटुंबाची यादी अद्ययावत करुन परिपूर्ण यादी म्हाडाकडे हस्तांतरित करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा