महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्र्यांनी यांचे विनम्र अभिवादन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत
नागपूर दि 02 : राष्ट्रपीता महात्मा गांधी यांच्या 150 वी जयंती तसेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री  जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
    
रामगिरी येथे महात्मा गांधी यांची 150 वी जयंती तसेच पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले.
    
यावेळी प्रभारी विभागीय आयुक्त अश्विन मुदगल, पोलीस आयुक्त डॉ. भुषणकुमार उपाध्यय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, महानगरपालिका आयुक्त रविंद्र ठाकरे आदि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
****

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा