सिद्धिविनायक मंदिर परिसरातील दुकानांवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्या धाडी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत



मुंबई, दि. 26 : श्री सिद्धिविनायक मंदिर परिसरात प्लास्टिकच्या बॅगेतून भाविकांना प्रसाद व फुले देणाऱ्या दुकानदारांवर पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी स्वत:हून धाडी टाकून  त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

श्री सिध्दीविनायक मंदिरात दर्शनासाठी आज पर्यावरणमंत्री गेले असता, मंदिरातील परिसरात काही भाविकांच्या हातामध्ये प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये प्रसाद, हार व फुले असल्याचे दिसून आले. या संदर्भात भाविकांना विचारणा केल्यानंतर मंदिर परिसरातील संबंधित दुकानातून या पिशव्या देण्यात आल्याचे भाविकांनी सांगितले. त्या दुकानांची पाहणी केली असता दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या प्लास्टिकचा साठा आढळून आला. त्यानंतर मंत्री श्री. कदम यांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून दुकानदारांवर कार्यवाही करुन दंड आकारण्याचे निर्देश दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा