महात्मा गांधी उद्यानात १३ वृक्षारोपणाने १३ कोटी वृक्षलागवडीचा समारोप

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

मुंबई दि. ३१ :  महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, मुख्य सचिव डी.के.जैन, वन विभागाचे सचिव विकास खारगे आणि इतर सर्व मान्यवरांच्या हातून मंत्रालयाशेजारील महात्मा गांधी उद्यानात १३ वृक्ष लावून १३ कोटी वृक्षलागवडीचा समारोप करण्यात आला.


राज्यात १ जुलै ते ३१ जुलै २०१८ या कालावधीत लोकसहभागातून १३ कोटी वृक्षलागवडीचा संकल्प करण्यात आला होता. चार दिवस आधीच हा संकल्प पूर्णत्वाला गेला. आज दुपारी ४ वाजेपर्यंत राज्यात १४ कोटी ७१ लाख ८८ हजार ४१७ वृक्ष  लागले.महात्मा गांधी उद्यानात मान्यवरांच्या हस्ते ताम्हण, बकुळ, पुत्रंजीवा, रुद्राक्ष, सीता अशोक, कापूरकाचरी, कदंब वृक्ष लावण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा