जयकुमार रावल यांनी घेतली केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची भेट; खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतनवी दिल्ली : खान्देश विभागात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांना केली.

श्री.रावल यांनी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन खान्देशात सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याबाबतची मागणी केली.  

खान्देश हा विभाग आदिवासी बहुल असून या भागात  धुळे, नंदुरबार, जळगाव हे जिल्हे मोडतात. या भागातील तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी सैनिक भरती प्रशिक्षण केंद्र मिळावे, अशी मागणी श्री.रावल यांनी श्री.भामरे यांच्याकडे केली.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री यांनी याबाबत सकारात्मक आश्वासन दिल्याची माहिती श्री.रावल यांनी दिली.श्री.रावल यांनी आज केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांचीही त्यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा