मौजे पिलवलीतर्फे सावर्डे गावठाणवाडी करिता नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना - बबनराव लोणीकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत


मुंबई, दि. ३१ : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील मौजे पिलवलीतर्फे सावर्डे गावठाणवाडी येथील पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणारी गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना पूर्णपणे नादुरुस्त झालेली आहे. त्यामुळे भौगोलिक परिस्थिती बघून नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज सांगितले.

गुहागर विधानसभा  मतदार संघ जिल्हा रत्नागिरी येथील खाडी भागातील गावांमध्ये उद्भवणाऱ्या पाणी टंचाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी  आमदार भास्कर जाधव, प्रकल्प संचालक हेमंत लांडगे, पाणीपुरवठा विभागाचे उपसचिव महेश सावंत, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता  तसेच इतर अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.


गुरुत्व पाणी पुरवठा योजनेतून गावच्या वाड्याना पाणीपुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे वाड्यांसाठी नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा ग्रामसभेमध्ये निर्णय घेतला आहे. त्यानुसार सदर गावासाठी नवीन गुरुत्व नळ पाणी पुरवठा योजना करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा