लोकमान्य टिळकांच्या सिंहगर्जनेच्या शताब्दी महोत्सवानिमित्ताने लोकमान्य महोत्सवाचे आज उदघाटन

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीतमुंबई दि.31 जुलै : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी दिलेल्या स्वराज्य  हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या ऐतिहासिक घोषणेला 100 वर्षे पूर्ण होत असल्याने राज्य शासनाकडून लोकमान्य उत्सवाचे आयोजन करण्याचे योजिले आहे.  या औचित्यपूर्ण कार्यक्रमाचा उदघाटन समारंभ हा लोकमान्य टिळकांच्या पुण्यतिथी दिनी दि.1ऑगस्ट 2016 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमुंबई येथे सकाळी वाजता आयोजित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षविधानसभा श्री. हरिभाऊ बागडे सभापतीविधान परिषद श्री. रामराजे नाईक निंबाळकरयांची विशेष उपस्थिती या समारंभास लाभणार आहे. प्रमुख उपस्थिती म्हणून वित्त व नियोजन मंत्री श्री सुधीर मुनगंटीवारसांस्कृतिक कार्यमंत्री श्री विनोद तावडे, पालकमंत्रीमुंबई शहरश्री सुभाष देसाई,  महापौरमुंबई श्रीमती स्नेहल आंबेकरलोकसभा सदस्यश्री अरविंद सावंतविधानसभा सदस्यश्री राज पुरोहित   विधानपरिषद सदस्य श्री राहूल नार्वेकर हे उपस्थित राहणार आहेत.

भारतीय स्वातंत्र्य लढयातील अग्रगण्य राजकीय पुढारीभारतीय असंतोषाचे जनकगणितज्ज्ञपत्रकारसंपादक म्हणून लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची भारताच्या इतिहासात ओळख आहे.  लोकमान्य टिळकांनी “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळविणारच” या दिलेल्या ऐतिहासिक सिंहगर्जनेला घोषणेला 100 वर्षे पूर्ण होत आहे. वर्ष 2016 हे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचे 160 वे जयंती वर्ष आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवाला पुढील वर्षी 125 वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने राज्य शासनाच्या वतीने लोकमान्य उत्सव व सार्वजनिक गणेशोत्सव अभियान या अंतर्गत वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. लोकमान्य उत्सवांतर्गत आयोजित करावयाच्या कार्यक्रमांची शासन लवकरच घोषणा करणार असून सार्वजनिक गणेशोत्सव अभियानातंर्गत तालुका स्तरापासून ते जिल्हास्तर ते विभागीय स्तरापर्यंत लोकमान्य टिळकांचे विचारत्यांची चतु:श्रुती तसेच अन्य उपक्रमांव्दारे जनजागृती घडवतील अशा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

टिप्पणी पोस्ट करा